Home LATEST NEWS ताजी बातमी जगभरात व्हायरल झालेल्या 97 वर्षांच्या आजी नेपाळच्या जीवघेण्या पुरातून ‘अशा’ बचावल्या

जगभरात व्हायरल झालेल्या 97 वर्षांच्या आजी नेपाळच्या जीवघेण्या पुरातून ‘अशा’ बचावल्या

2
0

Source :- BBC INDIA NEWS

जगभरात व्हायरल झालेल्या 97 वर्षांच्या आजी नेपाळच्या जीवघेण्या पुरातून ‘अशा’ बचावल्या

Published

नेपाळमध्ये पुराच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या 97 वर्षीय गुना माया बोहरा यांची प्रकृती रुग्णालयात सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

त्यांचे नातलग बीबीसी न्यूज नेपाळीशी बोलताना म्हणाले की, त्या एखाद्या युद्ध जिंकून परतलेल्या योद्ध्यासारख्या दिसत होत्या.

नेपाळ पोलिसांनी त्यांना उत्खनन यंत्राच्या पेल्यातून बाहेर काढतानाची दृश्ये जगभरात व्हायरल झाली आहेत.

देविघाटमध्ये आलेल्या पूर आणि चिखलामुळे अनेक घरे गाडली गेली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी गुना माया बोहरा यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चार तास प्रयत्न केले.

बुधवारी आलेल्या अचानक पुरात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हिमालयातील तिबेट सीमावर्ती भागात हिमनदी कोसळल्याने हा पूर आला असावा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC