Home LATEST NEWS ताजी बातमी जुळे नवरे, जुळ्या वधू, लग्न लावणारेही जुळेच; या लग्नात सगळंच ‘सेम टू...

जुळे नवरे, जुळ्या वधू, लग्न लावणारेही जुळेच; या लग्नात सगळंच ‘सेम टू सेम’

3
0

Source :- BBC INDIA NEWS

हे अनोखं लग्न अनेक वर्षांच्या नियोजनाचं फलित होतं.

फोटो स्रोत, Family Handout

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

केरळमधील एका अनोख्या लग्नाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्नात चार जुळ्या जोड्यांचा सहभाग होता.

या लग्नात जुळे भाऊ जुळ्या बहिणींशी विवाहबंधनात अडकले. विशेष म्हणजे, त्यांचा विवाहविधीही जुळे पाद्रीच पार पाडत होते आणि वेदीवरील सहाय्यक (अल्टर बॉय) म्हणूनही जुळे भाऊच उपस्थित होते.

हे अनोखं लग्न अनेक वर्षांच्या नियोजनाचं फलित होतं.

निखिल (डावीकडे) आणि अखिल (उजवीकडे) बऱ्याच काळापासून लग्नासाठी जुळ्या बहिणींचा शोध घेत होते.

फोटो स्रोत, Family Handout

वरांपैकी एक असलेले अखिल थॉमस म्हणतात, “या लग्नात जुळ्या मुलांची चार जोड्या सहभागी असणे हा काही केवळ योगायोग नाही.”

अखिल यांचे जुळे भाऊ निखिल थॉमस म्हणतात, “आम्ही जुळ्या बहिणींशीच लग्न करण्याचा निश्चय केला होता. आमच्यासाठी योग्य वधू शोधण्यासाठी आमच्या कुटुंबीयांनी जवळपास तीन वर्षं घालवली.”

‘जुळ्या बहिणींच्या शोधात राहिलात तर तुमचं लग्नच होणार नाही’

अखिल आणि निखिल हे दोघेही 32 वर्षांचे आहेत. ते जिथं राहातात त्या भागात लग्नासाठी हे वय जास्त मानलं जातं.

अखिल सांगतात, “आम्ही जवळपास 30 वर्षांचे झालो होतो. त्यामुळे नातेवाईक आम्हाला जुळ्या मुलींची वाट पाहू नका, असे सांगत होते.”

“जर आम्ही जुळ्या नसलेल्या मुलींशी लग्न करण्यास नकार देत राहिलो, तर आमचे लग्न कधीच होणार नाही”, असा इशाराही त्यांनी आम्हाला दिलेला.

दोन्ही बहिणींनाही जुळ्या भावांशीच लग्न करायचे होते

मुलांसाठी वधू शोधताना कुटुंबीयांनी जुळ्या व्यक्तींसाठी विशेष सेवा देणाऱ्या एका मॅरेज सर्व्हिसचीही मदत घेतली.

अखिल सांगतात की, मॅगी आणि मारिया यांना भेटण्यापूर्वी ते दोघे गेल्या काही वर्षांत सुमारे 40 जुळ्या बहिणींना भेटले होते.

हा विवाह सोहळा 30 जुलै रोजी केरळ राज्यातील कोट्टायम जिल्ह्यातील मेट्रोपॉलिटन चर्चमध्ये पार पडला.

फोटो स्रोत, Family Handout

योगायोग असा की, 31 वर्षीय मॅगी आणि मारिया यांनाही जुळ्या भावांशीच लग्न करायचं होतं.

मॅगी म्हणते, “लग्न करायचं तर फक्त जुळ्या भावांशीच करायचं, हे आम्ही लहानपणीच ठरवलेलं”

मारिया म्हणते, “अखिल आणि निखिल यांना भेटलो तेव्हा ते आम्हाला लगेच आवडले. तेच आमचे जीवनसाथी असावेत, असा निर्णय आम्ही घेतला.”

त्यांच्या लग्नाच्या विधीतही जुळ्या भावांचा सहभाग असावा, अशीही इच्छा या बहिणींनी व्यक्त केली.

दोन्ही कुटुंबांनी आपल्यासाठी योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी अनेक वर्षे शोध घेतला.

फोटो स्रोत, Family Handout

गेल्या वर्षी एका चर्चच्या कार्यक्रमात मॅगी आणि मारिया यांनी जुळे अल्टर बॉय जेरोन आणि जोहान जेम्स यांना पाहिले होते. त्यानंतर त्यांना हा विचार सुचला. लग्न ठरल्यानंतर त्यांनी त्या दोघांशी संपर्क साधून समारंभात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

जुळे पाद्री कसे मिळाले?

अखिल यांच्या आई काही महिन्यांपूर्वी चर्चमधील एका प्रार्थनासभेत जुळे पाद्री अँथो आणि अजो पेरुमकट्टील यांना भेटल्या होत्या. त्यानंतर विवाहविधीबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याची कल्पना सुचली.

अखिल म्हणतात, “मी पाद्र्यांशी संपर्क साधून सारी माहिती दिली तेव्हा ते खूप उत्साहित झाले.”

लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यापासून या जुळ्या पाद्र्यांचीही मोठी चर्चा सुरू झाली आहे.

जुळ्या पाद्र्यांचेही लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यापासून या लग्नाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

फोटो स्रोत, Family Handout

अजो म्हणतात, “हे लग्न आमच्यासाठी खरोखर अविस्मरणीय ठरलं.”

त्यांच्या मते, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून आणखी दोन कुटुंबांनी त्यांच्या जुळ्या मुलामुलींचे लग्न लावण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला आहे.

‘फोटो एवढे व्हायरल होतील, याची कल्पनाच नव्हती’

या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यापासून या जोडप्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

फोटो स्रोत, Family Handout

निखिल थॉमस म्हणतात, “आमचे लग्न प्रेमविवाह नाही. ते आमच्या पालकांनी ठरवलेलं म्हणजेच अरेंज्ड मॅरेज आहे.”

या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यापासून या जोडप्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले आहे, तर काहींनी या विवाहाला जुळ्या मुलांसाठी ‘स्वप्नवत लग्न’ असं संबोधलंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC