Source :- BBC INDIA NEWS

‘पायरीवर भाकरी मागितली, आज साहित्य अकादमीचा मान’, राजू बाविस्करांचा प्रेरणादायी प्रवास
लहानपणी पोटाची खळगी भरण्यासाठी गावात भाकरी मागण्याची वेळ आली… दुसरीत असतानाच शिक्षण सुटलं… जातीय भेदभाव आणि गरिबीचे चटके सहन करावे लागले. पण याच संघर्षातून एका कलाकाराचा आणि साहित्यिकाचा जन्म झाला. हे नाव म्हणजे राजू बाविस्कर.
‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्रातून त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष, गरिबी, जातीय भेदभाव आणि गावगाड्यातील माणसांचं जगणं शब्दांत मांडलं. याच पुस्तकाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




