Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Instagram
(या बातमीतील काही तपशील विचलित करू शकतात.)
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या मनजीत कौर यांचे सुमारे 2 महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
चंदीगड येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी चंदीगड पोलिसांनी 2 जणांविरोधात एफआयआर दाखल केली.
फोटो स्रोत, Instagram
पोलिसांच्या माहितीनुसार, मनजीत कौर यांच्यावर मेडिकल कॉलेजमध्ये (PGI) उपचार सुरू होते. त्या गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्याआधी त्यांच्यावर मोहालीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते.
खरड सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ गुरप्रीत सिंह यांनी सांगितले की, मनजीत कौर यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्यांच्या शरीरावर भाजल्याच्या गंभीर जखमा असल्याची माहिती रुग्णालयाने पोलिसांना दिली.
माहिती मिळाल्यानंतर खरड पोलीस मॅक्स रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी मनजीत यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनजीत यांचे कुटुंबीय म्हणाले की, त्या चंदीगडच्या सेक्टर 34 मध्ये त्यांच्या एका परिचित महिलेला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तिथे 2 जणांनी त्यांच्यासोबत मारहाण केली आणि त्यानंतर एका गाडीतून त्यांना मोरिंडा येथे नेले. तिथे ही घटना घडली.
यानंतर मनजीत यांच्या एका परिचिताने त्यांना मोरिंडा येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना मॅक्स रुग्णालयात पाठवण्यात आले.
त्यानंतर त्यांना चंदीगडच्या PGI (पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स) मध्ये रेफर करण्यात आले.
फोटो स्रोत, ANI/Instagram
मनजीत कौर यांना 9 जुलै 2026 रोजी चंदीगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते.
खरड सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ गुरप्रीत सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे खरड पोलिसांनी डीडीआर (डेली डायरी रिपोर्ट) नोंदवला आणि या प्रकरणाची संपूर्ण माहिती चंदीगडच्या सेक्टर 34 पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिली.
चंदीगडच्या डीएसपी (दक्षिण) गुरजीत कौर यांनी सांगितले की, मनजीत यांच्या आईच्या तक्रारीवरून सेक्टर 34 पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात आयपीसीच्या कलम 140(1) (अपहरण), 103(1) (हत्या) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण होत्या मनजीत कौर?
मनजीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या. त्यांनी आपल्या अकाउंटवर अनेक व्हीडिओ अपलोड केले होते. यामध्ये यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवरील व्हीडिओंचाही समावेश आहे.
फोटो स्रोत, Instagram
त्या मेकअप आर्टिस्ट होत्या आणि सोशल मीडियावर मेकअप तसेच गाण्यांशी संबंधित व्हीडिओ तयार करून शेअर करत असत.
इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे 1.46 लाख फॉलोअर्स
खरड सदर पोलीस ठाण्याचे प्रमुख गुरप्रीत सिंह यांच्या म्हणण्यानुसार, मनजीत कौर मूळच्या हरियाणाच्या रहिवासी होत्या. मात्र, सध्या त्या खरडमध्ये भाड्याच्या घरात राहत होत्या.
गुरप्रीत सिंह यांनी सांगितले की, मनजीत कौर यांचे अद्याप लग्न झाले नव्हते.
काही परिचित व्यक्तींसोबत त्यांचा वाद सुरू होता असे देखील त्यांनी पुढे सांगितले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




