Source :- BBC INDIA NEWS

‘हे’ छोटे-छोटे राजकीय पक्ष कोट्यावधींच्या देणग्या मिळूनही निवडणूक का लढवत नाहीत?
Published
5 शहरांमध्ये 2 महिन्यांच्या केलेल्या तपासामध्ये बीबीसीच्या टीमने 2023-24 या आर्थिक वर्षात (जे मागील लोकसभा निवडणुकीपूर्वीचं वर्ष होतं) सर्वाधिक देणग्या मिळवणाऱ्या 6 ‘नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षां’चा (RUPPs) आढावा घेतला.
बीबीसीच्या टीमला असं आढळून आलं की, शेकडो कोटी रुपयांच्या देणग्या मिळवूनही (काही प्रकरणांमध्ये राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक) हे पक्ष प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणापासून मात्र अलिप्तच राहिले.
तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या मते, हे पक्ष कदाचित स्वतंत्र राजकीय अस्तित्व बाळगणारे नसून करचोरी, मनी लाँड्रिंग, हवाला व्यवहार आणि इतर आर्थिक गैरप्रकारांसाठी केवळ एक मुखवटा (फ्रंट) म्हणून काम करत असावेत.
रिपोर्ट: शुभांगी मिश्रा
शूट-एडिट: दीपक जसरोटिया
ग्राफिक्स: वासिफ खान आणि चेतन सिंग
अतिरिक्त वार्तांकन: अभिक देब आणि तेजस वैद्य
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




