Source :- BBC INDIA NEWS

उच्चशिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या आरोपांवर डॉ. सुखदेव थोरात काय म्हणतात?
Published
18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यार्थ्याच्या मृत्यूला एक प्राध्यापक जबाबदार असल्याचा आरोप मुलाच्या आई-वडिलांनी केला.
तसेच या प्राध्यापकाने मुलासोबत जातिवाचक शिवीगाळ केली, मुलाला आपले जीवन संपवण्यास प्रवृत्त केले असे आरोप कुटुंबीयांनी केले आहेत.
कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षकाविरोधात जातिअत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिक्षकाने जातिवाचक भेदभाव आणि शिवीगाळ केला असल्याचा आरोप आयआयटी मुंबईने फेटाळला आहे.
यानंतर जातीय भेदभावाचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाच्या आरोपांवर डॉ. सुखदेव थोरात काय म्हणतात? जाणून घ्या
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




