Home LATEST NEWS ताजी बातमी सरला भट्ट : काश्मिरी पंडित नर्ससोबत 36 वर्षांपूर्वी घडली होती ‘अशी’ घटना,...

सरला भट्ट : काश्मिरी पंडित नर्ससोबत 36 वर्षांपूर्वी घडली होती ‘अशी’ घटना, अचानक चर्चेत आलं प्रकरण

4
0

Source :- BBC INDIA NEWS

सरला भट्ट

फोटो स्रोत, Sarla Bhat family

काश्मिरी पंडित नर्स सरला भट्ट हत्या प्रकरण 36 वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केल्यानं याची चर्चा सुरू झाली आहे.

पण सरला यांच्या कुटुंबीयांच्या मते, आता या आरोपपत्राचा त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना काहीही फायदा नाही.

“त्यांना 36 वर्षांत न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता या पोलीस कारवाईला त्यांच्या दृष्टीने काहीही अर्थ राहिलेला नाही,” असं सरला यांचे मावसभाऊ प्रद्युम्न कृष्ण यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पुढं म्हटलं की, “एक म्हण आहे ना, ‘उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नाकारण्यासारखाअसतो’, इथं अगदी तेच झालं आहे.

चार्जशीट दाखल झाल्यामुळे सरलाच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल अशी आशा नक्कीच निर्माण झाली असेल. पण तिच्या आई-वडिलांना न्याय मिलालेला नाही. आता आपल्या हिंदू धर्मात मानतात त्याप्रमाणे जर तिच्या आत्म्याला शांती मिळाली तर तेही खूप होईल.”

या प्रकरणात दहशतवादविरोधी न्यायालयात 737 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं असल्याचं, जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं.

प्रतिबंधित संघटना जेकेएलएफच्या (JKLF) दहशतवाद्यांनी सरला भट्ट यांचं अपहरण केलं होतं, असं म्हटलं जातं.

एका निवेदनात पोलिसांनी माहिती दिली की, सरला भट्ट यांचा छळ करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती.

“काश्मिरी पंडितांना लक्ष्य करून खोऱ्यात जो पद्धतशीर हिंसाचार चालवला जात होता. हा त्याच मोहिमेचा हा एक भाग होता. लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करणं आणि काश्मिरी पंडितांना तिथून पळून जाण्यास भाग पाडणं हाच यामागचा मुख्य हेतू होता,” असं पोलिसांनी म्हटलं आहे.

खुर्शीद अहमद चालकू यानेच सरला भट्ट यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, असं पोलिसांचं मत आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, या हत्याकांडानंतर चालकू पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये पळून गेला होता.

पोलिसांनी या प्रकरणात इतर तीन आरोपींची नावंही जाहीर केली आहेत. त्यात अब्दुल हमीद शेख, मोहम्मद युसूफ सुफी आणि गुलाम मोहम्मद टपलू यांचा समावेश आहे. पण हे तिन्ही आरोपी आता जिवंत नाहीत.

व्हॅनमधून अपहरण करून हत्या

27 वर्षे वय असलेल्या सरला ही शंभुनाथ भट्ट यांची मुलगी होती. शंभुनाथ दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात एका शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांना चार मुलं होती. त्यामध्ये मुलांमध्ये सरला सर्वात मोठ्या होत्या.

श्रीनगरच्या ‘शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मध्ये (SKIMS) नवजात बालकांच्या विभागात नर्स म्हणून त्या नोकरी करत होत्या.

त्यांच्या मावसभावाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “काश्मीरमध्ये जेव्हा दहशतवाद अगदी टोकावर होता तेव्हा आमच्या समाजाला धमक्या दिल्या जात होत्या. पण तरीही सरला यांनी घाबरून न जाता हॉस्पिटलमध्ये ड्युटी करणं सुरूच ठेवलं होतं.”

तिहार जेलमध्ये बंद असलेला JKLF प्रमुख यासीन मलिक, याच संघटनेने सरला भट्ट यांचं अपहरण केल्याचा होता दावा!

फोटो स्रोत, AFP

सरला यांचं 18 एप्रिल, 1990 रोजी SKIMS रुग्णालयाच्या हब्बा खातून हॉस्टेलमधून अपहरण करण्यात आलं होतं.

जेकेएलएफच्या (JKLF) अतिरेक्यांनी एका व्हॅनमधून त्यांचं अपहरण केलं होतं, असं सांगितलं जातं. दुसऱ्याच दिवशी लाल बाजार परिसरातील मल्ला बाग-उमर कॉलनी रोडवर त्यांचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.

पोलिसांच्या निवेदनानुसार, जेकेएलएफने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. भट्ट यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या हाताने लिहिलेल्या चिठ्ठीतून त्याचा पुरावा समोर आला होता.

चिठ्ठीमध्ये सरला या सुरक्षा दलांच्या खबरी असल्याचं लिहिलं होतं. 8 एप्रिल, 1990 ला श्रीनगरच्या नरवारा भागात पोलिसांनी छापा टाकला होता. त्याची माहिती सरला यांनीच दिली होती असा आरोप त्यांच्यावर केला गेला.

या कारवाईदरम्यान जेकेएलएफचा कमांडर यासीन मलिक (जो सध्या दहशतवादी कारवायांच्या गुन्ह्यात तिहार जेलमध्ये आहे) जखमी असूनही पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.

पण त्याच्या संघटनेच्या काही दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती.

सरला भट्ट यांच्या हत्येनंतर काय घडलं?

श्रीनगरमध्ये राहणाऱ्या भट्ट यांनी सांगितलं की, त्यांच्या मावस बहिणीची हत्या झाल्याची बातमी त्यांना पहिल्यांदा बीबीसी रेडिओवरूनच मिळाली होती.

काश्मीरमध्ये 1990 च्या काळात सगळेच जण बीबीसी हिंदी आणि उर्दूचे रेडिओ कार्यक्रम ऐकायचे. ही बातमी ऐकून भट्ट तातडीने अनंतनागला गेले. पण तोपर्यंत सरला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले होते.

संध्याकाळी सरला यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना स्मशानभूमीत पाठवलं गेलं. तिथे आधीच जवळजवळ 150 ते 200 लोकांची गर्दी जमली होती, असं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, “लोक आम्हाला शिविगाळ करू लागले आणि आमची थट्टा उडवू लागले. आम्ही अजून काश्मीरमधून पळून का गेलो नाही, असं ते विचारत होते.

मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्या अस्थी पायाखाली तुडवल्या. मी तातडीने मुठ्ठभर अस्थी गोळा केल्या आणि तिथून पळ काढला.”

अनंतनागमध्ये या पीडित कुटुंबाच्या घरावर ग्रेनेड फेकला गेला होता, असाही दावा केला भट्ट यांनी केला. ग्रेनेड घराच्या मुख्य दरवाजाजवळच फुटला होता.

ते पुढे म्हणाले, “पोलीस आमच्या मदतीला आले नाहीत. आम्ही कसेबसे धाडस करून रस्त्यावर आलो. अनंतनागच्या महिला पदवी महाविद्यालयाजवळ काही जवान होते. त्यांनी काका, काकी आणि माझ्या एका बहिणीला खानाबलपर्यंत पोहोचायला मदत केली तिथून ते जम्मूला निघून गेले.”

आयुष्यभर सोसावं लागलं दुःख

सरला यांचे आई-वडील आता वयाच्या नव्वदीत आहेत. ते जम्मूच्या मुठ्ठी परिसरात राहतात.

सरला यांचे इतर तीन भाऊ-बहीण विवाहित आहेत. त्यांच्या दोन भावांपैकी एक रमेशकुमार भट्ट हे नुकतेच शिक्षण विभागातून निवृत्त झाले आहेत.

बहिणीच्या आठवणी सांगताना रमेशकुमार भट्ट यांनी सांगितलं की, सरला यांचं लग्न झालं नव्हतं. पण सरला यांच्या हत्येच्या एक वर्ष आधी म्हणजेच 1989 मध्ये त्यांच्या लहान बहिणीचं लग्न झालं होतं.

आठवणी सांगताना ते म्हणाले, “तिच्या मनात लग्नाचा विचारच नव्हता. तिला फक्त आपल्या आई-वडिलांची आणि भावंडांची जबाबदारी सांभाळायची होती.

अनंतनाग येथील ते घर, जिथे काश्मिरी पंडित राहत होते.

फोटो स्रोत, @Nruphoto

आज मागे वळून पाहताना मला वाटतं की तिचा तो निर्णय बरोबरच होता. तिनं लग्न केलं असतं तर आज आणखी बरीच माणसं या दुःखात होरपळली असती.”

भट्ट यांनी पुढे सांगितलं, “सरलाचे आई-वडील आता एकदम गप्प झालेत. ते फक्त नावापुरतेच जिवंत आहेत. आपल्या लाडक्या मुलीला गमावण्याचं दुःख त्यांनी आयुष्यभर सोसलं आहे.”

तपासाला उशीर का झाला?

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ‘विशेष तपास यंत्रणेने (SIA) 18 मार्च, 2024 रोजी हा तपास आपल्या हाती घेतला होता.

श्रीनगरच्या न्यायालयात त्यांनी युक्तिवाद केला होता की, गेल्या तीन दशकांतील हिंसाचारामुळे तपासावर अत्यंत वाईट परिणाम झाला.

एजन्सीने कोर्टाला स्पष्ट केलं होतं की, काश्मीरमध्ये ‘दहशतवादी संघटनांनी जे भीती आणि दडपणाचं वातावरण तयार केलं होतं’, त्यामुळे साक्षीदार समोर येण्यास घाबरत होते आणि त्याचा तपासावर उलटा परिणाम झाला.

एजन्सीने तपासाला ‘दहशतवादाच्या पीडितांना न्याय देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा’ म्हटलं आहे.

2008 च्या पोलीस रिपोर्टनुसार, 1989 पासून काश्मीर खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 209 काश्मिरी पंडित मारले गेले होते. त्यापैकी 109 लोक फक्त 1990 मध्ये मारले गेले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC