Home LATEST NEWS ताजी बातमी मुंबईतील घाटकोपरमध्ये चाळीवर कोसळली दरड; दोन जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

मुंबईतील घाटकोपरमध्ये चाळीवर कोसळली दरड; दोन जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

2
0

Source :- BBC INDIA NEWS

मुंबईतील घाटकोपरमध्ये चाळीवर कोसळली दरड; दोन जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Published

वाचन वेळ: 2 मिनिटे

मुंबईतील घाटकोपर भागामध्ये मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास एका चाळीवर दरड कोसळल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

घाटकोपरमधील चिरागनगरमधील गौसिया चाळीवर हा ढिगारा कोसळला असून सध्या बचाव कार्य सुरू आहे.

सध्या पालिकेचे अग्निशामक दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईतील घाटकोपरमध्ये चाळीवर कोसळली दरड; दोन जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

नेमकं काय घडलं?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कुर्ल्यातील चिराग नगरमधील राठोड मेडिकलजवळ असलेल्या गौसिया चाळीत पहाटे 3 वाजून 48 च्या सुमारास ही दरड कोसळली.

यात चार ते पाच जण अडकल्याची शक्यता असून सध्या बचावकार्य सुरू आहे.

मुंबईतील घाटकोपरमध्ये चाळीवर कोसळली दरड; दोन जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पाऊस सुरू असल्यानं अशोक नगरमध्ये दरड कोसळली असून आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून पोलीसही तैनात करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी अनेक पथकं तैनात आहेत. चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे”, असंही त्यांनी सांगितलंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC