Home LATEST NEWS ताजी बातमी मुंबई पाऊस : मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू, पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई पाऊस : मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू, पावसामुळे जनजीवन विस्कळीत

2
0

Source :- BBC INDIA NEWS

मुंबईतील मानखुर्द येथे जनता नगरच्या 3 मजली चाळीचा काही भाग कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, X/Mayor of Mumbai

Published

वाचन वेळ: 2 मिनिटे

मुंबईतील मानखुर्द येथे जनता नगरच्या 3 मजली चाळीचा काही भाग कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 जण जखमी आहे.

ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्यही सुरू आहे. याबाबत एएनआय आणि आयएएनएस या वृत्तसंस्थांनी वृत्त दिलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयानेही याबाबत मध्यरात्री माहिती देताना म्हटलं की, मानखुर्दमध्ये घर कोसळून 5 बालकांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महापौर कार्यालयाने म्हटलं, “मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात रविवारी (5 जुलै) रात्री 8.30 वाजता अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या 3 मजली कच्चा चाळीतील 2 ते 3 घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.”

“घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले,” अशी माहिती देण्यात आली.

“या दुर्घटनेतील बाधितांना गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,” असंही त्यांनी नमूद केलं.

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

महापौर कार्यालयाने पुढे म्हटलं, “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल 1 महिला, 3 लहान मुली आणि 1 लहान मुलगा अशा 5 जणांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तसेच, राजावाडी रुग्णालयात 1 लहान मुलगा मृतावस्थेत आणण्यात आला आणि 1 तरुण जखमी अवस्थेत दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी महापौरांना दिली.”

“या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी आमदार अबू असीम आझमी, रुक्साना सिद्दिकी हेही उपस्थित होते,” असंही त्यांनी नमूद केलं.

आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक :

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC): 1916

पालघर: 02525-297474 / +91 82379 78873

ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827

ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101

पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC