Home LATEST NEWS ताजी बातमी रिलेशनमध्ये पैशांचा विषय आला की काय होतं? | गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची

रिलेशनमध्ये पैशांचा विषय आला की काय होतं? | गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची

2
0

Source :- BBC INDIA NEWS

रिलेशनमध्ये पैशांचा विषय आला की काय होतं? | गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची

Published

कुठल्याही नात्यात विश्वास, आदर आणि सहानुभूती या तीन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. पण कधीकधी या सगळ्या गोष्टी असूनही फक्त पैश्यांमुळे नाती खराब होतात.

आधुनिक काळात नात्यांमध्ये पैशांचं नियोजन आणि आर्थिक पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची ठरते. जोडीदारावर कर्ज आहे का, पैशांचे व्यवस्थापन कसं आहे, याबद्दल लग्नाआधी किंवा नात्याच्या सुरुवातीलाच बोलणं आवश्यक असल्याचं रिलेशनशिप कोच सांगतात.

नोकरी करणाऱ्या महिलांवर घर आणि पैसा अशा दोन्ही जबाबदाऱ्यांचं ओझं असतं, ज्यामुळे 50-50 ची विभागणी प्रत्यक्ष व्यवहारात सोपी नसते.

आर्थिक ताणामुळे महिलांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो. तसेच डेटिंग, महागड्या भेटी, विभक्त होताना होणारे आर्थिक वाद आणि स्वाभिमान या मुद्द्यांवरही या एपिसोडमध्ये चर्चा झाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC